
गुहागर मार्ग खड्डेमय रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा
गुहागर मार्ग अत्यंत निकृष्ट,दर्जाहीन बनला आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. गुहागर रामपूर तळ्यापर्यंत सिमेंट कॉंक्रीटचा बनविला, परंतु अनेक ठिकाणी भेगाच भेगा पडल्या आहेत. सिमेंट कॉंक्रीट रस्त्यावरही खड्डे पडले आहेत.
हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा, दळणवळणाचा आहे. सतत एस्. टी., दुचाकी वाहने, चार चाकी गाड्या, रिक्षा, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, कंटेनर वाहतूक चालू असते. दळणवळण भरपूर आहे. वाहन चालकांना -खड्ड्यातून तारेवरची कसरत करावी लागते. खड्डयात गाड्या वेड्या वाकड्या होतात.
अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अत्यंत दुर्लक्षपणा चालवलेला आहे. चिपळूण मधून बाहेर पडल्यावर उक्ताड गुहागर पर्यायी, मिरजोळीपर्यंत खड्डेच असल्याचे वाहनचालक व प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोंढे पूल रिगल कॉलेजच्या जवळचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. येथेही खड्डे पडले आहे. पाचाड वळणासह मालघर, निर्व्हळ, तांबी वाकण, रामपूर घाटी, रामपूर स्टँड, रामपूर तळे, मार्गताम्हाणे बाजारपेठ, मार्गताम्हाणे स्टँड या भागात कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडतो. रस्ता निकृष्ट बनला असून गुहागर एस्.टी. स्टँड ते शासकीय विश्रामगृह, मोडकाघर खड्डेमय, अनेक ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याला तडे गेले असून प्रचंड भेगा पडल्या आहेत.www.konkantoday.com




