
कोकणरत्न’, ’समाजभूषण’चे वितरण
संत गोराकुंभार विकास मंडळ व संत गोराकुंभार नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेर्डी येथील गोरोबाकाका सभागृहात झाली. या सभेत कोकणरत्न व समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
समाजातील विशेष योगदान देणार्या समाज बांधवांमध्ये जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, गुहागरचे सुरेश पालकर, रायगडचे अनंत महाडकर, सिंधुदुर्गचे नारायण साळवी, ठाण्याचे भास्कर कल्याणकर, नवी मुंबईचे मोहन कुंभार, मुंबईचे सुरेश बोरसे, पालघरचे भानुदास गोहेकर, गुहागरचे उमेश खैर तर समाजभूषण पुरस्कार विष्णू धोंडू पडवेकर, मनोहर बुरबाडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दहावी, बारावी, पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सतीश दरेकर, रमाकांत क्षीरसागर, रसिका खेडेकर, महेश सायकर, डॉ. सुरेश काळे, संजय रुईकर, यशवंत शेंदुलकर, विलास गुडेकर, प्रा. गणपत शिरोडकर, रमेश साळवी, वसंत घोडनदीकर, अनंत कुंभार, प्रकाश भालेराव, अण्णा राहुकर, मीना चौलकर, रमाकांत गोरे, सतीश येलमकर, प्रकाश साळवी, रवी साळवी, प्रकाश निवळकर, तुकाराम साळवी, तुकाराम टेरवकर, अमोल पिरदनकर, जनार्दन मालवणकर, प्रकाश कराडकर, दीपक शिरकर, संजय गुडेकर, अरविंद गुडेकर, अण्णा गुडेकर आदी उपस्थित होते.www.konkantoday.com




