
कराओके देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत अदिती प्रथम
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित आणि भारतीय जनता पार्टी राजापूर पुरस्कृत तालुका मर्यादित कराओके देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत अदिती अरुण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगर वाचनालयाच्या सभागृहात स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुलांपासून ते विविध क्षेत्रातील सुमारे ३० स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमाचा शुभारंभ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोहन घुमे, महेश मयेकर, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, शितल पटेल, श्रीम. रेणुका गुंडये, विवेक गुरव आदी उपस्थित होते.
गायकांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आता पर्यंतच्या जुन्या नव्या देशभक्तीपर गाण्यांचे उत्तम असे सादरीकरण केले. सर्व स्पर्धकांमधून अदिती अरूण यांनी प्रथम, पंकज बावधनकर यांनी द्वितीय तर नयन उगले यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सौम्या बावधनकर, आयेशा खलिफे या दोन छोट्या कलाकारांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. विजेत्यांना रोख रक्कम, चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्वाती नाईक यांनी केले. या कार्यक्रमाचे संकलन संदीप देसाई आणि निकेत उगले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मंदार बावधनकर, प्रसन्न देवस्थळी, निकेश पांचाळ, अभिजित पोवार, जगदीश पांचाळ, संतोष जुवळे, विनायक . सावंत, अविनाश पाटणकर, संदीप मसुरकर इत्यादींनी मेहनत घेतली.www.konkantoday.com