
अनारी येथे सतत पडत असलेल्या संततधारेने रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली…
अनारी (ता. चिपळूण) गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या संततधारेने अनारी गावातील हनुमानवाडी स्मशानभूमीजवळ असलेल्या अनारी रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून अशीच संततधार सुरु राहिली तर अनारी चिपळूण रस्ता देखिल खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काल चिपळूण तालुक्यासह विविध गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असताना अनारी गावातील हनुमानवाडी आणि बौद्धवाडी दरम्यान असलेली संरक्षक भिंत कोसळल्याने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंत कोसळून मातीचा भराव अनारी अडरे धरणाच्या जलाशयाकडे सरकला असून अजून पर्जन्यवृष्टी झाली तर अनारी चिपळूण रस्ता दोन भागात विभागला जाण्याची शक्यता असल्यान प्रशासनाने यासाठी तातडीन उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आज सकाळी गावचे पोलीस पाटील विजय जाधव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भरत जाधव, माजी उपसरपंच विजय कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पवार आणि स्थानिक कार्यकर्ते कृष्णा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालावे अशी विंनती त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com