स्वातंत्र्याची जाणीव ठेवून नवभारत साकारूया- प्राचार्य डॉ. मकरंद साखळकरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा

रत्नागिरी : आपण स्वातंत्र्य जे उपभोगत आहोत त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि युवकांना घडवून नवा भारत घडवण्याची ही वेळ आहे, संविधानाचा, ध्वजाचा मान राखावा, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य प्रा. मकरंद साखळकर यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी व वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम तसेच र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. गोसावी, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सायबर सुरक्षेची शपथ प्राचार्यांनी सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांना दिली. मशाल अंक, अर्थशास्त्र विभागाचा अर्थशोध अंकाचे प्रकाशन प्राचार्यांनी केले. महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदाचे सादरीकरण केले. प्रथम अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा कौतुक करण्यात आले. याशिवाय एसनसीसीमध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तृप्ती धामणस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

संशोधन विभागाची प्रगती
सायबर सिक्युरिटी ही अत्यंत आवश्यक असल्याची माहिती सायबर स्टॉलवरून सायबर वॉरियर्सनी दिली. विज्ञान शाखेमध्ये डेटा सायन्स, वाणिज्य विभागातर्फे एमबीए हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. महाविद्यालयाचे सशोधन विभागातर्फे अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्राप्त झाली आहे. संशोधन विभाग प्रगती करत आहे आणि अभिमानास्पद म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे अनेक शिक्षक पात्र ठरले आहेत, असे प्राचार्य डॉ. साखळकर यांनी आनंदाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button