सिंधुदुर्गात नांदगाव जवळ चायनीज आणायला गेलेल्या दोन युवकांची मोटरसायकल ट्रकवर आदळली, अपघातात दोघांचा मृत्यू


कणकवली येथील नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा.सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट मुस्लिमवाडी) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूने हुंबरट परिसरावर शोककळा पसरली आहे.

जैद व शाहीद हे दोघे चायनिज आणण्यासाठी होंडा शाईन दुचाकी घेऊन नांदगांवला गेले होते. तेथून परतत असताना बेळणे येथे महामार्गानजीक उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी तीव्र होती की, दुचाकीच्या हँडलसह दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तर दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दोन्ही युवकांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचाही मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button