
पत्रकारांचा सन्मान – नागरिकांना दिल्या छत्र्या
भाजप उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांचा उपक्रम; पत्रकार बांधवांबरोबरच नागरिकांनाही दिल्या छञ्या
रत्नागिरी :
पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष मा. डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या वतीने छत्री वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी डोंबिवली येथे केला. त्याच अनुषंगाने रत्नागिरी येथे पत्रकार बांधवांचा सन्मान करून, नागरिकांना दिल्या छत्र्या आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करण्यात आले.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांनी, “पत्रकार बांधवांचा सन्मान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांचा उपक्रम समाजहितासाठी आदर्शवत ठरेल”, अशा भावना व्यक्त केल्या.
रत्नागिरीतील कार्यक्रमास प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, उमेश कुळकर्णी, राजेश तोडणकर ,सचिन करमरकर,राजू भाटलेकर ,सौ. पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुसळधार पाऊस असताना देखील रत्नागिरीतील पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या पुढाकारातून शहरातील नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेश तोडणकर, मुन्ना चंवडे, समीर तिवरेकर, उमेश कुळकर्णी, सौ. संपदा तळेकर, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, माजी शहराध्यक्ष सचिन करमकर, धनंजय मराठे, पदाधिकारी राजन पटवर्धन, राजू भाटलेकर, सतीश सोबळकर, धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अमर रहाटे , मुकुंद जोशी, अनंत जाधव यांच्या हस्ते नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीने वतीने पुन्हा एकदा लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार बांधव यांचा सन्मान यानिमित्ताने केला. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.




