गौरी गणपतीच्या सणामध्ये गुहागरमधील अवजड वाहतूक बंद करून रस्त्यालगतची खोदाई तात्काळ थांबवावी…

भाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीतून निर्यात होणाऱ्या गॅसची वाहतूक, गुहागरमधून इतर राज्यात जाणारा जांभा दगड, गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी येणाऱ्या मालवाहतुकीच्या गाड्या या व्यतिरिक्त तालुक्यात अन्य होणारी अवजड वाहतूक २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या १५ दिवसांच्या कालावधीसाठी बंद करण्यात यावी. त्याचबरोबर तालुक्यामध्ये महावितरण व एअरटेल कंपनीकडून टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी होणारी खोदाई या दोन्ही खोदाई गौरी गणपतीच्या सणांमध्ये १५ दिवस बंद सक्तीने बंद होण्याची कारवाई तातडीने करण्याची मागणी भाजप गुहागर तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी केली आहे.

कोकणवासीयांच्या आत्मीयतेचा गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा सण साजरा होत असताना मुंबई, पुणे व तत्सम शहरातून गुहागरकडे येणारा चाकरमन्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात असतो. यावेळी महामंडळाच्या नियमित व जादा गाड्या, विविध शहरातून गुहागरकडे येणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक गाड्या, खाजगी गाड्या यांचे प्रमाण फार मोठे असते. या व्यतिरिक्त दुचाकींचा वापर वाढलेला असतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने येणारे चाकरमनीही मोठ्या प्रमाणात असतात. या कालावधीत गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीतून निर्यात होणाऱ्या गॅसची वाहतूक, गुहागर मधून इतर राज्यात जाणारा जांभा दगड, गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी येणाऱ्या मालवाहतुकीच्या गाड्या या व्यतिरिक्त तालुक्यात अन्य होणारी अवजड वाहतूक २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या १५ दिवसांच्या कालावधीसाठी बंद करण्यात यावी. त्याचबरोबर गुहागर तालुक्यामध्ये महावितरणची टाकण्यात येणारी भूमिगत केबल त्यासाठी होणारी रस्त्यालगतची धोकादायक खोदाई व एअरटेल या भ्रमणध्वनीच्या कंपनीकडून टाकण्यात येणारी केबल यासाठी होणारी खोदाई या दोन्ही खोदाई या गौरी गणपतीच्या सणांमध्ये वाहनांची व चाकरमान्यांची गाड्यांसहित होणारी गर्दी लक्षात घेता हे खोदाईचे काम सुद्धा १५ दिवस बंद ठेवणे अत्यावश्यक आहे.
गौरी गणपतीच्या सणानिमित्त होणारी गर्दी, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, होणारे अपघात लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि जीवित – वित्तहानी टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक व खोदाई या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये सक्तीने बंद होण्याची कारवाई तातडीने करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे भाजप गुहागरचे माजी अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक गुहागर, उप अभियंता सां.बां. विभाग गुहागर, उपकार्यकारी अभियंता म.रा. वी. वी. कंपनी गुहागर, कोकण एलएनजी कंपनी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button