
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळेकोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघणार
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी *आज दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ४:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंचांवरून ३ फुटापर्यंत उघडून १९,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण *२१,३०० क्युसेक विसर्ग सुरू होईल.
*नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.