
एस टी मधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून 44 हजार 200 रुपयांचा दंड वसूल
वर्षभरात रत्नागिरी एसटी विभागातील 115 वाहकांनी तिकिटाच्या पैशात हेराफेरी करत पैसे खिशात टाकल्यामुळेव विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली. एप्रिल 2024 ते जुलै 2025 पर्यंत वर्षभरात गर्दीचा फायदा घेत 162 प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांकडून 44 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आवडत्या लालपरीतून दररोज हजारो, लाखो प्रवास करीत असतात. परवडणारे तिकीट, पाहिजे तिथे प्रवास, गावोगावी जाणार्या बसेस यामुळे प्रवाशांची एसटीला पहिली पसंती असते. त्यामुळे अनेक जण एसटीतूनच प्रवास करतात.इतर गाडयांपेक्षा एसटीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घे घेऊन काही फुकटे प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, तर काही वाहक प्रवाशांना तिकिटाचे पैसे घेतात मात्र तिकीट न देता स्वत:च्या खिशात घालतात. मधल्या थांब्यावर उतरलेल्या प्रवाशांकडचे तिकीट घेऊन नवीन प्रवाशांना दिले जाते व ते पैसे स्वत:कडे ठेवले जाताात. प्रवाशांनी दिलेल्या अधिकच्या पैशातून तिकिटाची रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत न करणे, ड्युटी संपल्यानंतर जमा झालेले पैसे आगारात जमा न करणे अशा विविध कारणामुळे रत्नागिरी विभागातील 115 वाहकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 2024-25 च्या जुलैअखेरपर्यंत 162 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करीत 44 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.




