
आबलोलीत भल्या मोठ्या टँकरचा अपघात
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे मोठ्या पुलाचे काम चालू आहे या पुलाच्या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट काँक्रेटचा तयार माल भरलेला टँकर जात होता. मात्र तो आबलोलीली बाजारपेठे जवळ पलटी झाला यावेळी आबलोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौं. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पा कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, प्रमेय आर्यमाने, दत्ताराम कदम, योगेश पालशेतकर, संजय कदम, चंद्रकांत कदम तसेच आबलोली सब पोलीस स्टेशनचे पोलीस, गुहागर बांधकाम विभागाचे बांधकाम अधिकारी आणि आबलोलीतील ग्रामस्थांनी अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात विनोद कदम यांच्या घराचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र रात्री 9:00 वाजता झालेला अपघात आणि टँकर आहे त्याच स्थितीतच आहे तरी शासन प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन हा टँकर काढावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून होतेय