
नायशी उपकेंद्रातील तो औषधांचा साठा तपासणीसाठी शासकीय प्रयोग शाळेत
चिपळूण तालुक्यातील नायशी उपकेंद्रात सापडलेल्या बुरशीसदृश व डागयुक्त पॅरासिटामोल औषध प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्याचे औषध निरीक्षक सोपान वाडे यांनी नायशी उपकेंद्राला भेट देवून इतर औषध साठ्याची पाहणी केली. वहाळ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी निरजा यादव यांनी ताब्यात घेतलेल्या त्या औषधांचा साठा सील करत तपासणीसाठी मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच उपकेंद्र व आरोग्य केंद्रातील औषध विभागास रूग्णांना औषधे वितरित करताना खात्री करून द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
चिपळूण तालुक्यातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या नायशी उपकेंद्रातील रूग्णांना वितरित केलेल्या बुरशीसदृश पॅरासिटामोलचा साठा बुधवारी दुपारी ताब्यात घेतला होता. हा साठा सील करून प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया गुरूवारी करण्यात आली. खबरदारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात आलेला सर्व पॅरासिटामोल साठा सील करण्यात आल्याची माहिती औषध निरिक्षक सोपान वाडे यांनी दिली आहे.www.konkantoday.com




