
दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुडावळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला मोठा पूर
दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुडावळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे दापोली-मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.दादर पुलावरून नदीचे पाणी वाहत असून मागील तीन तासांपासून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दापोली व मंडणगड मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नदीपात्र ओसंडून वाहत असल्याने दापोली शहर तसेच परिसरातील खेडी धोक्याच्या स्थितीत आहेत.




