
कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने छेडण्यात आलेले उपोषण सुरूच
कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने छेडण्यात आलेले उपोषण शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस लेखी उत्तर मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.गुरूवार नंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु असताना लांजा तहसीलदार यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्तांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र सायंकाळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली होती. मात्र ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याबाबत केलेल्या मागणीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस उत्तर न दिल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले नाही.




