
आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू ,अनेक गोविंद जखमी
राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खासकरून मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंद जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुर आहेत. तसेच काही गोविंदांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन गोविंदांचा मृत्यू झाला आहे. रात्री 9 वाजेपर्यंत 95 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 19 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.




