
स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री यांच्या हस्ते अवयवदात्यांचा गौरव
दि. 16 ऑगस्ट 2025
दि. 03 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी मार्फत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेचे मार्गदर्शन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट यांनी केले.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये अवयव दानाविषयी जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली. विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी येथील अधिकारी व आरोग्य कर्मचारी,आशा यांनी अवयवदान जनजागृतीत सक्रिय सहभाग घेतला.
यामध्ये शासकीय औषध निर्माण महाविद्यालय रत्नागिरी, महालक्ष्मी विद्यालय खेडशी, अ. के. देसाई माध्यमिक विद्यालय रत्नागिरी, नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी तसेच विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अवयवदानाविषयी माहिती दिली गेली.
मोहिमेदरम्यान ऑनलाईन अवयव दान प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात आली. ज्या भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती तेथे १२७ व्यक्तींनी ऑफलाईन नोंदणी फॉर्म भरले, तर ७७० व्यक्तींनी ऑनलाईन ईच्छापत्र सादर केले.
जनजागृतीसाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्या मार्फत अवयवदान रॅली आयोजित करण्यात आली. या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा मोठा सहभाग होता.
अभियानाच्या शेवटच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अवयवदात्यांचा सत्कार सोहळा पार पडला. नामदार डॉ. उदयजी सामंत, मंत्री (उद्योग व मराठी भाषा) यांच्या हस्ते तीन अवयवदात्यांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित अवयवदाते :
कै. रतन सुर्वे यांचे सुपुत्र श्री रमेश रतन सुर्वे व कुटुंब
कै. सुशिला मांडवकर यांचे सुपुत्र श्री प्रदीप मांडवकर व जावई श्री निल झगडे
कै. श्रीधर दत्तात्रय जोशी यांचे नातेवाईक श्री योगेश रमेश जोशी
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट, नेत्रदान समुपदेशक राम चिंचाळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी शशांदीप उगेवकर उपस्थित होते. –
-(डॉ. भास्कर जगताप), जिल्हा शल्यचिकित्सक,
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी..




