सवतसड्यावर पर्यटक वाहून गेल्याची शेवटीअफवा ठरली, मित्राने घातला घोळ, गैरसमजातून प्रशासनाची धावपळ, तरुण सुखरूप


*चिपळूण | * सवतसडा धबधब्यावर एक तरुण पर्यटक पाण्यात वाहून गेल्याची बातमी शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी धावून गेले. मात्र, प्रत्यक्षात काहीही दुर्घटना न घडता, संबंधित तरुण सुखरूप सापडला.

खात्रीशीर माहितीनुसार, सदर तरुण आपल्या मित्रासोबत सवतसडा धबधबा पाहण्यासाठी गेला होता. काही वेळाने तो नजरेआड झाला. मित्राने परिसरात शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे अघटित घडल्याची शंका येऊन मित्राने चिपळूणमधील ओळखीच्या व्यक्तीला “माझा मित्र पाण्यात वाहून गेला” अशी माहिती दिली.
मित्राकडून मिळालेली ही चुकीची माहिती क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘सवतसड्यावर पर्यटक वाहून गेला’ अशी चर्चा शहरात जोर धरू लागली. पाहता पाहता प्रशासन, पोलीस व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले
दरम्यान, हरवलेला समजला जाणारा तरुण डोंगर चढून वर गेला होता. परतीची वाट न सापडल्याने तो काही काळ दिसून आला नाही. मित्राने त्याला फोन केला, मात्र पावसामुळे मोबाईल खिशातून न काढल्याने संपर्क होऊ शकला नाही. शेवटी तो सुखरूप सापडला आणि अनावश्यक धावपळीचा शेवट झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button