
“प्र.ल.” माहितीपट सहाव्यांदा सह्याद्री वाहिनीवर
कै.प्र.ल. मयेकरांच्या स्मृतिदिनी १८ ऑगस्टला होणार प्रसारण
रत्नागिरी दि.१६
मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा नाट्यरसिकांना अनुभवता येणार आहे.ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारित “प्र.ल.” हा माहितीपट सोमवार दि.१८ ऑगस्ट रोजा दुपारी तीन वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.”प्र.ल.” हा माहितीपट सहाव्यांदा सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण होणार आहे. समर्थ रंगभूमीची निर्मिती असलोल्या
”प्र.ल.” माहितीपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन दुर्गेश आखाडे यांचे आहे.निवेदन अभिनेते अविनाश नारकर,प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.छायाचित्रण अजय बाष्टे,संकलन धीरज पार्सेकर,ध्वनीमुद्रण उदयराज सावंत यांचे आहे.निर्माते श्रीकांत पाटील असून सहनिर्माते देवीलाल इंगळे आहेत.
”प्र.ल.” हा माहितीपट सहाव्यांदा सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
फोटो
प्र.ल.मयेकर