
प्रसिद्ध देवस्थान श्री गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू
कोकण किनारपट्टीवरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिराला आता दर्शनासाठी येणार्या भविकांना ड्रेसकोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर केली असून महाद्वाराजवळ याबाबतचा फलक लावण्यात आला आहे.
अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या मंदिराला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून आणि परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. या मंदिराच्या पावित्र्याचा आदर राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. ही नियमावली लागू झाल्याने मंदिराच्या पावित्र्याचा आदर राखला जाईल आणि भाविकांना शांत व पवित्र वातावरणात दर्शन घेता येईल, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com