
रो रो कारसेवेला प्रतिसाद नाही, ५० जणांकडून चौकशी, बुकींग अवघे दोनच
गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावर २३ ऑगस्टपासून कोलाड ते वेर्णादरम्यान धावणार्या रो रो कारसेवेला चाकरमान्यांचा अजूनही थंडाच प्रतिसाद मिळाला आहे. या सेवेसाठी ५० जणांनी चौकशी केली. मात्र वाहनांच्या आरक्षणाकडे पाठ फिरत आतापर्यंत अवघ्या दोनच जणांनी बुकींग केल्याची माहिती समोर आली आहे. सेवेच्या आरक्षणासाठी १३ ऑगस्ट मुदत होती. हा आरक्षण कालावधी वाढवण्यात आला असून १८ ऑगस्टपर्यंत कारसेवेचे आरक्षण करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न कायम आहे. यातून गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रथमच खाजगी कारची वाहतूक करण्यासाठी रो रो कारसेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत कोकण मार्गावर कोलाड ते वेर्णादरम्यान रो रो कारसेवा धावणार आहे. २१ जुलैपासून सेवची आरक्षण प्रक्रिया खुली झाली. मात्र गेल्या २२ दिवसात अवघ्या दोघांनीच बुकींग केली आहे.ँ
www.konkantoday.com




