
रत्नागिरी तालुक्यातील निवेंडीत गळफास घेत युवकाची आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी बौद्धवाडी येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. निखिल मंगेश कदम (१९.) असे त्याचे नाव आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास निखिल हा म्हैसकोंड, तळेवाटवाडी येथे त्याच्या मालकीच्या जागेत काजूच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला, अशी नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आहे. निखिलने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जयगड पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
www.konkantoday.com