
रत्नागिरी तालुक्यातील गोळप-रनपार रस्त्यावर संशयास्पद हालचाल करणार्याविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील गोळप-रनपार रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाया संशयिताविरूद्ध पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री १० वाजता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. सोबान हसन सारंग (७८, रा. गोळप मोहल्ला, मुसलमानवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ११ ऑगस्ट रोजी सोबान हा तोंडाला रूमाल बांधून संशयास्पद हालचाल करत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी सोबान याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com