
चिपळूण शहरासाठी साकारल्या जात असलेल्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेची कामे रस्त्यांच्या मुळावर
चिपळूण शहरासाठी साकारल्या जात असलेल्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या पाईपलाईनसाठी गुहागर बायपास मार्गावर चक्क रस्त्याच्या कडेलाच खोदाई केली जात आहे. ती करताना रस्त्याचीही दुरवस्था होत आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याला गटार काढताना व त्याचे रूंदीकरण करताना ही पाईपलाईन अडचणीची ठरणार आहे. तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
तब्बल २० वर्षानी शहरासाठी १५५ कोटींची ग्रॅव्हीटी पाणी योजना साकारली जात आहे. ठेकेदार कंपनीने खेंड, गोवळकोट व डिबीजे महाविद्यालय परिसरात सुरू केलेले साठवण टाक्या बांधण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पाईपलाईन टाकण्याचे कामही वेगात सुरू आहे. ही योजना १५५ कोटी ८४ लाख रुपयांची असली तरी आतापर्यंत नगर परिषदेला शासनाकडून केवळ १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा विचार करता त्यापेक्षा अधिक रकमेची कामे हाती आहेत. त्यामुळे पुढील निधी उपलब्ध न झाल्यास नजिकच्या काळात योजनेच्या पुढील कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com




