चिपळूण शहरातील सवतसडा धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे केरळचा पर्यटक वाहून गेला


चिपळूणजवळील प्रसिद्ध सवतसडा धबधब्यावर आज दुर्घटना घडली आहे चिपळूण येथील सवतकडा धबधबा सर्वांनाच मोहित करून घेतो त्यामुळे या धबधब्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते आज सकाळी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या केरळमधील एका 25 वर्षीय तरुण पर्यटक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. राहुल लाल असे त्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, नाले आणि विशेषतः धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. आज स्वातंत्र्यदिन असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक सवतसडा धबधब्यावर गर्दी करतात. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने राहुल लाल यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button