
शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता 8 ऑक्टोबरला
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे – शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी 8 ऑक्टोबर 2025, बुधवारी पुन्हा होणार आहे.