
विषबाधा झालेले पेढे परजिल्ह्यातील, अन्नप्रशासन विभागाकडून तपास सुरू
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे रस्त्यालगत असलेल्या वेदांत ज्वेलरीमधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे. शृंगारतळी येथील एका बेकरीमधील पेढ्याचे इतर बॉक्स ताब्यात घेतले आहेत. मात्र हे पेढे नजीकच्या जिल्ह्यातील एका कंपनीचे असल्याने याबाबतची कारवाई नक्की कोणावर होते, याकडे लक्ष लागले आहे.
अन्न, औषध प्रशासनाकडे तपास विषबाधा झालेल्या सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर त्या घरी गेल्या आहेत. मात्र तालुक्यात घडलेल्या या घटनेने बेकरीमधील पेढे खरेदीची सध्या भीती वाटू लागली आहे अशा मध्येच बाहेरून येणार्या पॅकबंद पेढ्यातून झालेली ही विषबाधा याचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला आहे. जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते. हे अधिक तपास करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये, शृंगारतळी बेकरी येथील पॅक बंद अन्नपदार्थाचा उर्वरित साठा ताब्यात घेऊन नमुने घेण्यात आले आहेत. या पॅक बंद अन्नपदार्थाच्या पुरवठादार पेढीबाबत पुढील चौकशी सुरु आहे.www.konkantoday.com