
रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा विमा योजनेपासून वंचित राहणार
दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत सरकारने निर्णय केला आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी जिल्ह्यातून अद्याप अर्ज घेणे किंवा प्रशिक्षण मिळवणे याविषयी काहीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे दुर्घटना झाल्यास जिल्ह्यातील गोविंदा भरपाईपासून वंचित राहणार आहेत.
राज्य सरकारने २३ जुलै रोजी एक शाासन निर्णय जारी केला. त्यामध्ये मानवी मनोरे रचताना दहीहंडी खेळात दुर्घटना घडली तर गोविंदांना भरपाई बाढवण्याचा प्रस्ताव होता. मृत्यू अथवा दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, अपूर्ण अपंगत्व आल्यास विमा पॉलिसीत नमूद केलेल्या टक्केवारीप्रमाणे भरपाई मिळण्यासाठी शासनाने योजना केलीwww.konkantoday.com




