
मुंबई, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, येलो अलर्ट
राज्यात पाऊस पुन्हा हळूहळू जोर धरत आहे, आज 14 ऑगस्ट 2025 रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल तर वारे ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वाहण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज ठाणे, मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरचा घाट विभाग आणि साताऱ्याचा घाट विभागात, रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, जालना, बीड, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, लातूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.