
नॅब संस्थेच्या उपाध्यक्षपदी ईब्राहिम दलवाई
चिपळूण : राष्ट्रीय अंध कल्याण संघ (नॅब) संस्थेच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सरचिटणीस श्री इब्राहिम दलवाई यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे, चिपळूण तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातील नावाजलेले व्यक्तीनत्व इब्राहिम दलवाई विविध संघटनांच्या कामात सहभागी असतात. अलीकडेच चिपळूणमधील मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे ते अध्यक्ष झाले. इब्राहिमभाई महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस पदी, डि.बी.जे. कॅालेजच्या संचालक मंडळावर, जिल्हा बॅंकेच्या संचालक पदावर देखील कार्यरत होते. तसेच मिरजोळी गावाचे सरपंच आणि दलवाई जमात मिरजोळीचे अध्यक्ष राहिले असून ते इतर सामाजिक, शैक्षणिक क्रीडा व राजकीय क्षेत्रात राज्यपातळीवर अनेक पदे भूषवली आहेत. ते त्यांच्या नीतिमत्तेशी एकनिष्ठ राहण्यासाठी आणि राजकारणापलीकडे विविध विचारसरणीच्या लोकांशी चांगले संबंध राखण्यासाठी ओळखले जातात.
१९९४ रोजी चिपळूण येथे स्थापना झालेल्या नॅब या संस्थेचे अंधत्व प्रतिबंधन व उपाय, अंधाचे पुनर्वसन, शैक्षणिक पुनर्वसन, व्यावसायिक पुनर्वसन, वैवाहिक पुनर्वसन ही संस्थेची उद्दिष्टे असून तेथे सामान्य अंध नोंदणी (रत्नागिरी जिल्हा), अंध बांधव व भगिनींना मुंबई / पुणे / नाशिक येथे प्रशिक्षण क्रेंद्रामध्ये प्रशिक्षण देणे, दर ३ वर्षानी अंध मेळावा घेण्यात येणे, अंध बांधव व भगिनींना ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे व्हाईट केन आणि काळा गागल यांचे दरवर्षी वाटप करण्यात येणे, अंध बांधव व त्यांच्या पाल्यांना दरवर्षी शैक्षणिक पुनर्वसन अंतर्गत शैक्षणिक साहित्य / शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात येणे व इतर महत्वाचे उपक्रम राबवले जातात.
गेली २० वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत, या संस्थेत श्री. विवेक रेळेकर यांनी त्यांना संधी दिली याचा ते नेहमीच उल्लेख करतात. संस्था उभी करताना अतोनात कष्ट घ्यावे लागतात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे, ती संस्था आज नावारुपाला आणण्यासाठी श्री. सुचयअण्णा रेडीज यांचे योगदान खूप मोलाचे आहे. सातत्याने १५ वर्षा पेक्षाही अधिक काळ त्यांनी निःस्वार्थीपणे यशस्वीपणे धुरा सांभाळली हे उल्लेखनीय आहे, त्याना मिळालेल्या सहकार्यांचेही तेवढेच कौतुक आहे, आज भक्कम पायावर उभी असणाऱ्या संस्थेचे कौतुक राज्यभरात असणाऱ्या नॅब या वर्तुळात आदराने घेतले जाते हे देखील विशेष उल्लेखनीय आहे. इब्राहिम दलवाई यांनी अंध बांधवांसाठी देण्यात येणाऱ्या या हॅास्पीटल मधील रुग्णाना अॅापरेशन द्वारे (कॅटर्र्याक) व विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे याचे समाधान अप्रतिम आहे हे स्पष्ट केले. तसेच दलवाई यांची नुकतीच चेअरमनपदी नियुक्ती झालेली ‘नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल’ ही रत्नागिरीतील चिपळूण येथे २००३ साली मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई या संस्थेद्वारे स्थापित नामांकित शाळा आहे.