
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यामुळे वाहतूक मार्गात बदल! ट्रॅफिक ॲडव्हायझरी पाहून संतापले लोक!!
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचे १२ जुलै २०२४ रोजी लग्न होणार आहे. लग्नासंबंधी विविध विधी व कार्यक्रम सुरू झाले असून, त्यासाठी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. संपूर्ण अंबानी कुटुंब आणि बॉलीवूडमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एकीकडे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींची गर्दी होत आहे; तर दुसरीकडे हॉलीवूड सेलिब्रिटीही यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. या विवाह समारंभास जगभरातून व्हीव्हीआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी १२ ते १५ जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे.हे लग्न इतके उच्च प्रतिष्ठित झाले आहे की, मुंबई पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी लोकांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली असून, ती पाहून लोक संतप्त झाले आहेत. ट्रॅफिक ॲडव्हायजरीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासामुळे ते संतापले आहेत आणि ते आपला राग सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने काढत आहेत.www.konkantoday.com*




