
ठाणे महापालिकेला बसणार 150 कोटी रुपयांचा फटका
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे वाढू नयेत यासाठी अशा मालमत्तांना मालमत्ता कराच्या दीडपट शास्ती लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही शहरात अनधिकृत बांधकामे वाढतानाच दिसून आल्याने अनधिकृत बांधकामांना लावलेली शास्ती (दंड) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शहरातील एक लाख 45 हजार मालमत्ताधारकांना होणार असला तरी महापालिकेच्या तिजोरीला सुमारे 150 कोटींची तूट न सहन करावी लागणार आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला मोठा फटका बसणार आहे.