संघवीज फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेजतर्फे टेक्निशियन्सचा मेळावा उत्साहात.

रत्नागिरी : येथील संघवीज फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक दिलीप संघवी आणि अक्षत संघवी आणि गोदरेज कंपनीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील टेक्निशियन्सचा मेळावा हॉटेल मथुरा येथे आयोजित केला. या मेळाव्याला जिल्ह्यातून ५० जण उपस्थित होते.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्हा रेफ्रिजरेशन असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर वासावे, उपाध्यक्ष मुद्दस्सर ठाकूर, समीर मुजावर, नौशाद वाडकर, मनिष शिंदे, जीवन जायगडे व सभासद यांच्या सहकार्याने मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.अरिहंत मॉलमधील संघवीज फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरूम गेली 20 वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना अविरत सेवा देत आहे. विक्रीपश्चात सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्याच्या हेतूने डिलर, गोदरेज कंपनी आणि टेक्निशियन यांचा समन्वय साधून ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे दिलीप संघवी यांनी सांगितले. वस्तू खरेदी पश्चात सर्व्हिसच्या दृष्टीने संघवीज फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निशियन, सर्व्हिस स्टेशन आणि कंपनी मॅनेजमेंट यांच्याकडे संपर्क साधून ग्राहकांना कोणताही त्रास न‌ होता चांगली सर्व्हिस देण्यावर आमचा भर असतो. ग्राहकांना मिळणाऱ्या चांगल्या सेवेमुळेच ग्राहकांचा वाढता कल आमच्याकडे दिसतो. याबाबतचे सातत्य राखू, अशी ग्वाही संघवी यांनी दिली. जिल्ह्यातील कोणत्याही गावात वस्तू खरेदीनंतर मोफत डिलिव्हरी देण्यात येते. मागणीनुसार फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे वितरण व विक्री पश्चात सेवा देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, असे मत व्यक्त केले.श्री. संघवी यांच्या सहकार्यामुळेच रेफ्रिजरेशन तंत्रज्ञ, कारागिरांनी आमचा विश्वास वाढला असून संघवीज् फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्ससोबत राहून काम करण्याचे वचन दिले. काही दिवसांतच गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांना फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विशेष सूट आदी योजनांचा सविस्तर उल्लेख करून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन संघवी यांनी केले.गोदरेज एअरकंडिशनबाबत क्वालिटी प्रॉडक्ट, १० वर्ष काँम्प्रेसर, ५ वर्षे पीसीबी, गॅस चार्जिंग, रिमोट आदी वॉरंटीबाबत ग्राहकाला कोणताही भुर्दंड न देता कंपनी फ्री सर्व्हिसबाबत माहिती देण्यात आली. ही माहिती गोदरेज अॅप्लायन्सचे भानू प्रसाद बल्ला, गोदरेज कंपनी सर्व्हिस इन्चार्ज अविनाश पाटील व गोदरेज ट्रेनर व्यंकटेश यांनी दिली. याप्रसंगी संघवीज फर्निचरतर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. टेक्निशियन यांची उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली. आभार सुधीर वासावे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button