
संगमेश्वर रेल्वे स्थानकात स्टॉल धारकाकडून अस्वच्छ ठिकाणी होतेय कोल्ड्रींक्स व पाण्याचा साठा
रेल्वे स्थानकावरील एका स्टॉलधारकाने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व कोल्ड्रिंक्स अस्वच्छ ठिकाणी उघड्या गटारावर आणि दुर्गंधीयुक्त चेंबरशेजारी ठेवून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रवाशांनी विचारणा केली असता या स्टॉलधारकाने अरेरावी करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित स्टेशन मास्तरांना कळविले. बापट यांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आठ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही, यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.www.konkantoday.com