
लांजा सापुचेतळे येथे चिरेखाण कामगाराला बसला इलेक्ट्रीक वायरचा शॉक
सापुचेतळे (ता. लांजा) येथे चिरेखाणीवर चिरे काढण्याच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नेश लाखण ठाकूर (२७, रा. सापुचेतळे, ता. लांजा, मूळ : मध्यप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सापुचेतळे येथे घडली. जखमी रत्नेश हा महेंद्र चव्हाण यांच्या चिरेखाणीवर काम करत होता. त्याच्यासोबत सुनिल गौंड, राम रतन गौंड (सर्व (सर्व रा. मध्यप्रदेश) हे देखील होते. सोमवारी सकाळी रत्नेश कामवरील चिरेखाणची इलेक्टीक आडा मशीनने चिरे काढत होता. मशीनच्या इलेक्ट्रीक वायरला उजव्या हाताने पकडून बाजूला केले असता त्याला जोरदार शॉक लागला. त्यात तो जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी सापुचेतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.www.konkantoday.com