
राजकारणात गुन्हेगारी फोफावतेय, देशभरात ८० हजारांहून अधिक राजकीय गुन्हे न्यायालयात प्रलंबित
देशाच्या राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. जे लोक कायदा तोडताहेत तेच कायदा बनवण्यासाठी पुढे येत आहेत. संपूर्ण देशभरात ८० हजारांहून अधिक राजकीय गुन्हे न्यायालयात प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आणत या विषयी कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी चिंता व्यक्त केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार-आमदार हे लोकशाहीसाठी गंभीर धोका आहेत. त्यांच्या प्रकरणांतील निर्णय लांबवून त्यांना पाच वर्षे सत्तेचा उपभोग घेऊ दिला जातो, ही लोकशाहीची थट्टा आहे, असा थेट आरोपही केला.
२०१६ साली झालेल्या संदीप सावंत मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऍड. असिम सरोदे सोमवारी चिपळुणात आले होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर घणाघात केला. ऍड. सरोदे पुढे म्हणाले, जे आमदार-खासदार कलंकित आहेत, ज्यांच्यावर आरोप आहेत ती प्रकरणे लवकरात लवकर संपविली पाहिजेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही आज देशभरात तब्बल ८० हजार ६६५ राजकीय नेत्यांवरील गुन्हगारांची प्रकरपणे प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील १८३ विशेष न्यायालयांमध्ये ४४७ राजकीय नेत्यांवर गुन्हे प्रलंबित आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात ६ प्रकरणे प्रलंबित होती त्यात वाढ होऊन १२ झाली.www.konkantoday.com




