
रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर
रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या नूतन अध्यक्षपदी राजापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे अग्रणी युवा नेतृत्व तथा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश भिकू मांडवकर यांची बहुमताने निवड झाली आहे.
कोकणातील पाच जिल्ह्यातील कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या अधिपत्याखाली त्या-त्या जिल्ह्यांमध्ये मातृसंस्था आणि तालुका शाखा ग्रामीण समितीमध्ये समन्वय राखण्याचे महत्वपूर्ण काम ही कुणबी समन्वय समिती करीत असते. रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीचे काम अधिक जोमाने व्हावे याकरिता रत्नागिरी येथे समन्वय समितीची बैठक संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आगामी पाच वर्षाकरिता रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.
www.konkantoday.com