
मिरकरवाडा जेटीवरुन समुद्रात पडलेल्या बैलाला स्थानिक तरूण व पोलिसांनी दिले जीवदान
रत्नागिरी तालुक्यातील मिरकरवाडा येथील दोन नंबर जेटीवर सोमवारी दुपारी समुद्रात पडलेल्या एका मोकाट बैलाची स्थानिक तरुण आणि पोलिसांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे सुटका झाली. पाण्यातून बाहेर बैलाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली, त्यामुळे त्या बैलाला पाण्यातून उचलून आणत त्याचा जीव वाचवण्यात आला.
सोमवारी दुपारी एक मोकाट बैल अचानक समुद्राच्या खोल पाण्यात पडला. खोल पाण्यातून त्याला बाहेर काढणे जवळपास अशक्य होते. हे दृश्य पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बैलाला वाचवण्यासाठी फकीर मोहम्मद, सुहेल मजगावकर, यासीन मजगावकर, सलिम, जाविद आणि इम्रान या स्थानिक तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी धावाधाव सुरू केली.www.konkantoday.com




