
गणेशोत्सव काही दिवसांवर मुर्तीकारांची लगबग; गणेशमूर्तीचे काम अंतिम टप्यात
गणेशोत्सवासाठी काही दिवस राहिल असल्यामुळे मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील गणेशमूर्तीच्या कारखान्यात मूर्तीना रंगरंगोटी करण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
लाडक्या गणरायाचे दि. २७. ऑगस्टला आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मूर्तिकार गणेश मूर्तीना रंग देण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, ब्रश, स्टिनरच्या किमतीत ८ ते १० टक्के वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीही सुमारे १० ते १२ टक्क्यांनी वाढणार आहेत.www.konkantoday.com




