
“कांचन डिजिटल”तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे दिमाखात आयोजन!
💠 आज अंगारकी संकष्टी शुभमुहूर्तावर घोषणा
💠 पारितोषिकांच्या रक्कमेत यंदा वाढ
💠 गणेशभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल”तर्फे यंदाही “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” दिमाखात आयोजित करण्यात आली आहे. गणेशभक्तांत अल्पावधित लोकप्रिय ठरलेल्या या स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष आहे. आज अंगारकी संकष्टीच्या शुभमुहूर्तावर यंदाच्या स्पर्धेची घोषणा करण्यात येत आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. “कांचन डिजिटल”तर्फे आयोजित करण्यात येणारी ही “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” ही अत्यंत दर्जेदार, भव्यदिव्य अशी ख्याती प्राप्त आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा होणारा लक्षणीय पारितोषिक वितरण सोहळा खास वैशिष्ट्य आहे.
यंदा स्पर्धेच्या प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय कांचन यांनी घेतला आहे. याचबरोबर विशेष उल्लेखनीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्याचा निर्णय कांचन मालगुंडकर यांनी घेतला आहे. तेव्हा गणेशभक्तांनी जोरदार तयारीला लागण्याचे आवाहन मालगुंडकर यांनी केले आहे.
“कांचन डिजिटल”तर्फे आयोजित करण्यात येणारी “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” ही अत्यंत दर्जेदार, भव्यदिव्य अशी ख्याती प्राप्त आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा होणारा लक्षणीय पारितोषिक वितरण सोहळा खास वैशिष्ट्य आहे.
🔸—————————————————-✨
“सुबक गणेशमूर्ती” या नव्या पारितोषिकाची वाढ
यंदा “सुबक गणेशमूर्ती” या एका नव्या पारितोषिकाची वाढ करण्यात येणार आहे. मात्र स्पर्धेत सहभागी घरगुती सजावट करण्यात आलेल्या ठिकाणच्याच गणेशमूर्तीला हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच हे पारितोषिक ती गणेशमूर्ती साकारलेल्या गणेशमूर्तिकाराला देण्यात येणार आहे.
✨—————————————————-🔸
■ गणेशोत्सव स्पर्धेची पारितोषिके :-
★ पहिलं बक्षीस : 15 हजार रुपये व ट्रॉफी
★ दुसरे बक्षीस : 10 हजार रुपये व ट्रॉफी
★ तिसरं बक्षीस : 6 हजार रुपये व ट्रॉफी
★ विशेष उल्लेखनीय ★ उत्तेजनार्थ बक्षिसे
■ गणेशोत्सव स्पर्धेची नियमावली :-
□ गणेशमूर्ती, आरास, देखाव्यामध्ये सुबकता हवी.
□ पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आशय, संदेश असल्यास उत्तम.
□ धर्माकॉल, प्लॅस्टिक, फ्लेक्स आदी पर्यवरणाला हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींचा वापर टाळललेला असावा.
■ नावनोंदणीसाठी भ्रमणध्वनी – 9422576736
□ अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी -8999332757
□ नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख :- 24 ऑगस्ट 2025
□ स्पर्धेचे परीक्षण तज्ञ परिक्षकांद्वारे करण्यात येईल.
□ परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.




