
रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात ’जागर’ अन् ’सापड’ काढण्याची परंपरा
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पण याच तयारीचा एक अनोखा आणि पारंपरिक रंग रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात पहायला मिळतो. इथे गणपतीच्या स्वागताची तयारी जागर’ आणि ’सापड काढणे’ या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांनी केली जाते.
जागर म्हणजेच गावातील एकोपा आणि श्रद्धेचं प्रतीक मानले जाते. येणार्या गणेशोत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी गावकर्यांनी एकत्र येऊन गावदेवाच्या मंदिरात गणपती बाप्पासाठी खास पोवती तयार केली. ही पोवती म्हणजे केवळ एक धागा नसून ती गावदेवाच्या आशीर्वादाचं आणि गावातील एकोप्याचं प्रतीक मानली जाते. या पोवत्यांना गावदेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून देवाला रूप लावले जाते. त्यानंतर याच पोवत्या प्रत्येक घरातील गणपतीला आणि देवघरातील देवाना अर्पण केल्या जातात. ही परंपरा गावातील प्रत्येकाला एकात्मतेच्या धाग्यात बांधते. आजही गावागावात ही पूर्वापार प्रथा सुरू आहे.
www.konkantoday.com