
धामणवणे-खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी खून प्रकरणी दुसर्या सहकार्याच्या शोधासाठी पथक परजिल्ह्यात
तालुक्यातील धामणवणे-खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या ट्रॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर याने दागिने आणि पैसे याच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात त्याच्या आणखी एका साथीदाराचा समावेश आहे. तो परजिल्ह्यात असल्याच्या माहितीवरुन त्याच्या शोधासाठी पोलीस पथक त्या जिल्ह्यात रवाना झाले आहे. दरम्यान, अटकेतील जयेश याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
www.konkantoday.com