
खेड नगर परिषदेच्या स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी प्रतीक्षेत
खेड नगर परिषदेच्या हद्दीतील जगबुडी नदीलगतच्या चिपळूणनाका सार्वजनिक स्मशानभूमीसमोर उभारण्यात आलेल्या संकटात प्रशासनामार्फत विद्युत शवदाहिनी उभारणीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होवूनही गेली ३ वर्षे या शवदाहिनीची कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. ठेका घेतलेल्या परप्रांतीय ठेकेदारही गायब झाला आहे. रखडलेल्या कामांमुळे अनेक साहित्य चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने शवदाहिनीतून अंत्यसंस्काराच्या प्रक्रिया सुरू होण्याआधीच लाखांच्या निधीची राख होत असताना नगरपरिषद मात्र हतबल होवून बसली आहे.www.konkantoday.com