
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक धडकणार आहेतमुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार आहे. त्यात उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत.