
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची स्थापना
राज्य अध्यक्षपदी विश्वास मोहिते तर उपाध्यक्ष दिपक मोहिते, सरचिटणीस डॉ. संतोष गायगोले यांची निवड.
रत्नागिरी
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली प्रकरणे ही राष्ट्रीयकृत बँकांकडून अडवली जात असल्यामुळे आणि ती वितरण करताना वेगवेगळे अटी सांगून मागासवर्गीयांना वेठीस धरले जात असल्यामुळे यावरती अंकुश ठेवण्यासाठी आणि गोरगरिबांना कर्ज मिळवून उद्योग व्यवसाय करण्यात यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील काही कार्यकर्त्यांमधून एक नवीन समिती गठीत करण्यात आले असून ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्ये ही कार्यकारीने पुढील प्रमाणे निवडण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी पाडळी केसे तालुका कराड जिल्हा सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी अहमदनगर येथील दीपक मोहिते यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी रत्नागिरी येथील असलम शेख तर सरचिटणीस पदी डॉक्टर संतोष गायगोले यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय महामंडळाची स्थापना कोणत्या उद्देशाने केली. त्या उद्देशाप्रमाणे महामंडळाने मंजूर केलेली कर्ज प्रकरणे मागासवर्गीय यांना वेळेवर वितरित केली जातात का? याचा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आढावा घेतला जाईल. शिवाय ज्यांची प्रकरणी मंजूर करण्यात आलेली नाहीत किंवा मंजूर करूनही बँकांनी त्यांना वितरित केलेली नाहीत त्याबाबत ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी विश्वास मोहिते यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या राज्य कार्यकारिणीचे काही उर्वरित पदे अजूनही रिक्त असून ती पदेही भरली जातील त्याच बरोबर या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये समिती स्थापन करण्याचा आमचा विचार आहे ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे. मागासवर्गीय कष्टकरी मजुरांची महामंडळाच्या माध्यमातून कर्जासंदर्भातले विषय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची तयारी आहे अशा जरूर या समितीमध्ये काम करावे त्यांना संधी दिली जाईल असे ही आवाहन यावेळी विश्वास मोहिते यांनी केले आहे.