
दिल्लीला निघालेले एअर इंडियाचे विमान खराब हवामानामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई येथे उतरवले, अपघात टळला
तिरुअनंतपुरमहून नवी दिल्लीला निघालेले एअर इंडियाचे विमान खराब हवामानामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे चेन्नई येथे उतरवण्यात आले.धक्कादायक म्हणजे या विमानामध्ये अनेक खासदार देखील होते. तब्बल दोन तास हे विमान लँडिंग करण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वांनी आपला जीव मुठीत धरला होता.
याबद्दल माहिती सांगताना एअर इंडियाने म्हटले की, फ्लाइट क्रमांक A12455 ला चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले आहे आणि विमानाची आवश्यक चौकशी केली जाईल. या विमानात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदारही उपस्थित होते. याबद्दलची अधिक माहिती कंपनीकडून सांगण्यात आली, त्यांनी म्हटले की, 10 ऑगस्ट रोजी तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या AI2455 विमानातील कर्मचाऱ्यांनी संशयास्पद तांत्रिक समस्या आणि खराब हवामानामुळे खबरदारी म्हणून चेन्नईला विमान सुरक्षितपणे उतरवले.
प्रवाशांना झालेल्या सर्व गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. चेन्नईतील आमचे सहकारी प्रवाशांना मदत करत आहेत आणि त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. त्यांना परत पोहोचवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्रिवेंद्रमहून दिल्लीला एअर इंडियाचे विमान AI2455 हे शेकडो प्रवाशांना घेऊन निघाले होतेआजचा दिवस भयानकपणे दुर्दैवाच्या अगदी जवळ आला होता. उड्डाणानंतर काही वेळात आम्हाला वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. त्यांनी पुढे म्हटले की, एक तासानंतर कॅप्टनने फ्लाइट सिग्नलमध्ये बिघाड असल्याची माहिती प्रवाशांना दिली आणि थेट दिल्लीला निघालेले विमान हे चेन्नईकडे वळवण्यात आले. आमचे विमान तब्बल दोन तास हवेत फेऱ्या मारत होते आणि लँडिंगसाठी वाट पाहत होते. हा अनुभव आमच्यासाठी अत्यंत वाईट राहिला असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक प्रवाशांनी थेट मरण्याच्या दारातून बाहेर आल्याचेह म्हटले.