दस्तुरी ते वेताळवाडी मार्गावरील खड्डे मुजवण्यासाठी काँक्रीट तसेच दापोली ते साखरोली रस्त्यावर खडी व ग्रीटचा वापरखड्डेमुक्त रस्त्यासाठी ठेकेदारास सूचना -कार्यकारी अभियंता ज. ई. सुखदेवे


रत्नागिरी, दि. 11 ) : दस्तुरी ते वेताळवाडी (कि.मी. २१/२०० ते २३/००) या लांबीतील खड्डे काँक्रीट चा वापर करुन तसेच दापोली ते साखरोली दरम्यान लांबीतील रस्त्यावरील खड्डे खडी व ग्रीट चा वापर करुन भरण्यात येत आहेत. खेड नगरपरिषद हद्दीतील लांबीमधील खड्डे भरणे दिवसाच्या वाहतुक वर्दळीमुळे शक्य नसल्याने, रात्रीच्या वेळी काँक्रीट किंवा डांबर इमल्शन चा वापर करुन भरण्याचे नियोजन करण्यात आलेले असून रस्त्याची संपूर्ण लांबी खड्डेमुक्त करुन रस्ता वाहतुकीस सुरळीत ठेवण्याबाबत ठेकेदारास वेळोवळी कळविण्यात आले असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणचे कार्यकारी अभियंता ज. ई. सुखदेवे यांनी केला आहे.
खेड –भरणे मार्गावरील काँक्रिटची मलमपट्टी पाण्यात या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली होती. सा.बां.चिपळूणचे कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे यांनी पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे. दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता रा. मा. १६२ या रस्त्यावर हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत सुधारण करण्याचे काम मे.काळकाई देवी रोड प्रा.लि. या ठेकेदारा मार्फत प्रगतीत आहे. या रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावर पावसाळ्यात पडलेले खड्डे भरण्याचे काम ठेकेदारामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. या रस्त्याच्या कि.मी. २१/२०० ते २३/०० (दस्तुरी फाटा ते वेताळवाडी) व २४ /७०० ते २९/०२० (डेंटल कॉलेज – खेड नगरपरिषद लांबी ते भरणे नाका) या लांबीत खड्डयांचे प्रमाण जास्त आहे. सदरहु खड्डे सुरवातीला खडी व ग्रीट चा वापर करुन वारंवार भरण्यात आले आहेत. परंतु अतिवृष्टी व वाहतुक वर्दळीमुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडत आहेत. खड्डे
भरण्यासाठी रेडीमिक्स काँक्रीटचा वापर देखील खेड शहर हद्दीमधील लांबीतील खड्डे भरण्यासाठी करण्यात आलेला आहे. परंतु नगरपरिषद हद्दीतील वाहनांच्या सततच्या रहदारी मुळे भरलेले खड्डे भक्कम होण्यास पुरेसा अवधी मिळत नसलेने, भरलेले खड़डे उखडत आहेत.
मागील दोन दिवसांपासून दस्तुरी ते वेताळवाडी (कि.मी. २१/२०० ते २३/००) या लांबीतील खड्डे काँक्रीट चा वापर करुन तसेच दापोली ते साखरोली दरम्यान लांबीतील रस्त्यावरील खड्डे खडी व ग्रीट चा वापर करुन भरण्यात येत आहेत. खेड नगरपरिषद हद्दीतील लांबीमधील खड्डे भरणे दिवसाच्या वाहतुक वर्दळीमुळे शक्य नसलेने, रात्रीच्या वेळी काँक्रीट किंवा डांबर इमल्शन चा वापर करुन भरण्याचे नियोजन करण्यात आलेले असून रस्त्याची संपुर्ण लांबी खड्डेमुक्त करुन रस्ता वाहतुकीस सुरळीत ठेवण्याबाबत ठेकेदारास वेळोवळी कळविण्यात आले आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button