
अलिबाग तालुक्यात एका मच्छीमाराच्या जाळ्यात कोट्यावधी रुपयाच्या तब्बल सहा टन घोळ माशांचे घबाड
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात अलिबाग तालुक्यातील एका मच्छीमाराच्या जाळ्यात तब्बल सहा टन घोळ माशांचे घबाड सापडले आहे. या सहा टन घोळ माशांची किंमत सुमारे कोट्यवधी रुपये असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जाते.31 जुलै रोजी संपून असून 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली आहे. 1् ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीची बंदी उठली असली तरी वादळी हवामानामुळे आणि बहुतांश मासेमारी नौका नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारीला खोल समुद्रात जातात. रायगड जिल्हयात अडीच हजार यांत्रिकी आणि तर तीनशे नौका बिगर यांत्रिकी आहेत. यातील बहुतांश नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या नाहीत. मात्र 1 ऑगस्टपासून सुरु होणारा मच्छीमारीचा हंगाम अत्यंत महत्वाचा असतो.
या काळात मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची मासळी समुद्रात जवळच उपलब्ध असते. त्याने काही मच्छीमार बंदी कालावधी संपताच आपल्या नौका मासेमारीसाठी उतरवितात.अलिबाग तालुक्यातील अलिबाग, साखर-आक्षी, वरसोली, नवगाव, बोडणी, रेवस, आदी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. 1 ऑगस्टपासून काही मोजक्याच नौका मासेमारीसाठी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ लागल्या आहेत.येथील साखर-आक्षी येथील काही मासेमारी बोटींद्वारे मासेमारी सुरु झाली आहे. यातील एक नौका मासेमारी करीत असताना मोठ्या प्रमाणात घोळ मासे जाळ्यात मिळून आले आहेत अशी माहिती मच्छीमारांकडून देण्यात येत आहे. स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार या घोळ माशांचे वजन सहा टनापर्यंत असल्याचे सांगितले जाते. या घोळ माशांची बाजारातील किंमत सुमारे एक कोटींपर्यंत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येते. या मोसमाच्या सुरुवातीलाच घोळ मासे मिळत असल्यामुळे सध्या मिळणारे घोळ मासे ही मच्छिमाराला लागलेली लॉटरीच मानली जाते. सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




