
सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या वतीने शहिदांना आदरांजली
9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जांभेकर विद्यालयाच्या एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी जयस्तंभ येथे स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या पवित्र स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी ,ए एन ओ/फर्स्ट ऑफिसर /सहाय्यक शिक्षिका स्नेहल पावरी , पूनम नाटेकर व सुयश मोहिते उपस्थित होते.