
सिंदूर महा रक्तदान यात्रा यशस्वीपणे पूर्णत्वाकडे…

आज जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर महा रक्तदान यात्रेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगलीतून आलेल्या रक्तवीरांची भेट घेऊन त्यांच्या नियोजनाची चौकशी केली. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात, पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ही सिंदूर यात्रा यशस्वीपणे पूर्णत्वाकडे जात आहे, हे पाहून मन आनंदित झाले, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी एम्स रुग्णालयातील सर्व कर्मचारीवृंदांचे विशेष आभार मानले तसेच रक्तवीरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. या उपक्रमातून शिवसेनेचे नाव जगभरात पोहोचत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे सांगत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी एम्स रुग्णालयातील प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
या कार्यक्रमाला CEO Dr. शक्ती कुमार गुप्ता, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांसह जम्मूतील शिवसेना पदाधिकारी आणि रक्तवीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.