
विजयदुर्ग किल्ल्याचा व्यंकट बुरुज खालच्या बाजूने ढासळला
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू काल लाटांच्या माराने ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे.पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते.
पावसाळ्यात समुद्राला उधान येत असल्याने लाटांचा वेग या दरम्यान वाढत असतो. अशातच काल रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली